पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल : हार-पराजय महत्त्वाचा नव्हता : श्रीनिवास वनगा

 "हार-पराजय माझ्यासाठी महत्त्वाचा नव्हता, तर मला बाबांचं कार्य पुढे न्यायचं होतं. ज्या चुका झाल्या त्या सुधारणार. 2019 ची लोकसभा निवडणूक नक्कीच जिंकणार," अशी प्रतिक्रिया पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दिली.

राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झाला. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत जवळपास 30 हजार मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. निवडणूक आयोग आता याबाबतची औपचारिक घोषणा करणं बाकी आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अर्धी झाल्यानंतर श्रीनिवास वनगा थेट शेतात काम करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी पालघर पोटनिवडणुकीतील पराभवावर भाष्य केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola