अहमदनगर : शेवगावात ऊसदरासाठीचं आंदोलन हिंसक, आंदोलक-पोलिस आमनेसामने
Continues below advertisement
ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे.
या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.
दरम्यान, गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला.
Continues below advertisement