मुंबई : आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली
आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याची मुदत आता 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आलीय. आधार-पॅन लिंक करण्याची मुदत तीन ते सहा महिन्यांनी वाढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिलीय. या मुदतीत जर हे आधार लिंक झालं नाही तर मात्र संबंधिताचं पॅन कार्ड रद्द केलं जाणार आहे. याआधी आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबर 2017 अशी होती. एकूण 33 कोटी पॅनधारकांपैकी नोव्हेंबरमध्ये 13.28 कोटी पॅनधारकांनी आधार लिंक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.