नागपूर : लिंगायत हा वेगळा धर्म नाही, तो हिंदू धर्मातील एक पंथ - राज्य सरकार

Continues below advertisement
लिंगायत हा वेगळा धर्म नाही. तो हिंदू धर्मातीलच एक पंथ आहे. लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचं अल्पसंस्खांकमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. तसं लेखी उत्तर तावडे यांनी विधानसभेत सादर केलंय. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांकचा दर्जा देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला तावडेंनी उत्तर दिलंय. 2014 मध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंस्खांक विभागानं राज्य सरकारला एक अभिप्राय पाठवला होता. त्यात विरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून, हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचं नमूद केलं होतं. २०१३ मध्येही केंद्राच्या अल्पसंख्यांक विभागानंही राज्य सरकारला असं कळवलं होतं. त्यामुळे आता लिंगायत समाज काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram