WEB EXCLUSIVE : पावसाळ्यात त्वचाविकारांनी हैराण, या वातावरणात कशी घ्याल त्वचेची काळजी, तज्ञांचा सल्ला ऐका
Continues below advertisement
पावसाळी आजारांचा त्रास वाढत असताना त्वचाविकारांनीही मुंबईकर हैराण झाले आहेत. पावसाळी वातावरणामुळे हवेत ओलावा असतो, हे वातावरण त्वचाविकारांची वाढ होण्यासाठी पोषक असल्याचे निरीक्षण त्वचाविकारतज्ज्ञांनी नोंदवलं आहे. त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येणे, त्वचा कोरडी पडणे, चट्टे येणे त्याचसोबत डोक्यावर बुरशी येणे अशा समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जातं आहे. यात लहान मुलांमध्ये त्वचेचे विकार सध्या अधिक बघायला मिळत आहेत. त्याचसोबत बुरशीजन्य त्वचाविकारातही वाढ झाल्याने स्वत:ची स्वच्छता राखण्याचा सल्ला डाॅ. नीलम कोठारी यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी..
Continues below advertisement