Child Vaccination : 18 वर्षांआतील मुलांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, 'कोवोव्हॅक्स' लशीला WHOची मंजुरी
Continues below advertisement
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. सीरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोवोव्हॅक्स ही लस निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर वापराची मंजुरी मिळणारी कोव्होव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाल्यामुळं १८ वर्षाखालील मुलांच्या लसीचा मार्ग सुकर झाला आहे.
Continues below advertisement