ABP News

Plastic Surgery: काय सांगता? प्लॅस्टीक सर्जरीने जीव जातो ? | Fitness Majha

Continues below advertisement

मेडीकल सायन्समे इतकी प्रगती केलीये की, दुर्धर आजारसुद्धा आधुनिक उपचाराने बरं करणं आता शक्यय. याच अॅडव्हान्स मेडीकल टेक्निक्समध्ये मोडतेय प्लॅस्टिक सर्जरी. तुम्हाला प्लॅस्टीक सर्जरीबद्दल नक्कीच माहित असणार. तुम्ही ते कुठेतरी वाचलं असणार, ऐकलं असणार कींवा तुमच्या ओळखीतल्या कुणीतरी केली असणार कींवा तुमच्या स्वतःचा या ट्रिटमेंटशी संपर्क आला असेल. पण, तुम्हाला खरंच या ट्रिटमेंटविषयी सगळं काही माहित आहे का? विचारण्याचा उद्देश हा, की दोन दिवसापुर्वीचीच बातमी आहे.कन्नड अभिनेत्री चेतना राजचे प्लॅस्टिक सर्जरीमुळे निधन झालंय.तिनं वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. खरंच प्लॅस्टीक सर्जरीमुळे जीव जाऊ शकतो? प्लॅस्टीक सर्जरी बद्दल काही प्रश्न मलापण पडले. प्रश्न तुम्हाला पण पडले असतील.प्लास्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त त्वचा रोग असणाऱ्या रुग्णांसाठी असते का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. प्लास्टिक सर्जरीबाबत अनेक समज गैरसमज आहे. अभिनेत्री चेतना सोबतच असं का झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करुयात या व्हिडीओच्या माध्यमातून

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram