Diabetes : भारतात गेल्या चार वर्षांमध्ये चार कोटी जनतेला मधुमेह, एकूण आकडा 10 कोटीहून अधिक
Continues below advertisement
भारतात आताच्या घडीला 10 कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. २०१९मध्ये ही संख्या ७ कोटी होती. म्हणजेच, केवळ चार वर्षात ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण झाली. टक्केवारी पाहिली तर ही वाढ ४४ टक्के इतकी आहे. अधिक धक्कादायक म्हणजे साडे तेरा कोटी नागरिक हे प्री-डाय़बेटिक आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. Indian Council of Medical Research अर्थात ICMRनं ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गोवा, पुदुच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात दर एका मधुमेह रुग्णामागे ४ प्री-डायबेटिक केसेस आहेत, अशी माहितीही लॅन्सेटमध्ये देण्यात आली आहे. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणे ही डायबेटीसची तीन प्रमुख कारणं आहेत.
Continues below advertisement