Sharad Pawar Threat : ...तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह भेट घेतली.