Corona Vaccine : कोरोनाविरोधातील लढाईत ' जाॅन्सन अॅन्ड जाॅन्सन' या पाचव्या लशीला मंजुरी ABP Majha
नई दिल्ली: जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे. मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Tags :
Corona Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Corona Vaccine Updates ABP Majha ABP Majha Video Joahnson And Johnason Vaccine