Plastic Ban : 'सिंगल यूज प्लॅस्टिक'वर 1 जुलैपासून बंदी, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मोठी घोषणा

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राप्रमाणे देशभरातील सिंगल युज ऑफ प्लॅस्टिकच्या वापराबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार देशभरातील प्लॅस्टिक प्लेट्स, कप, मिठाईचे डबे, सिगारेटच्या पाकिटावर चढविण्यात येणारे प्लॅस्टिक आणि तत्सम इतर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 

देशभरात येत्या 1 जुलैपासून  देशभरात प्लॅस्टिक प्लेट्स, कप, मिठाईचे डबे, सिगारेटच्या पाकिटावर चढविण्यात येणारे प्लॅस्टिक आणि तत्सम इतर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी जाहीर केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करताना कंपोस्टेबल प्लॅस्टिकचा वापर करण्याची मुभा यावेळी देण्यात आली आहे.या निर्णयामुळे प्लास्टिक व्यवसायिक यांना मोठा फटका बसणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram