दिल्ली : पत्नीच्या हत्येप्रकरणी क्राईम शोचा अँकर सुहेब इलियासीला जन्मठेप
इंडियाज मोस्ट वाँटेड शोचा निर्माता आणि अँकर सुहेब इलियासीला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाने हा निर्णय दिला. 16 डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं होतं.
शिक्षा सुनावताच सुहेब कोर्टात जोरजोराने ओरडला. ''मी निर्दोष आहे, माझ्यावर अन्याय होतोय'', असं तो म्हणाला. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सुहेबचं कुटुंब आणि त्याची पत्नी अंजूची आईही उपस्थित होती.
शिक्षा सुनावताच सुहेब कोर्टात जोरजोराने ओरडला. ''मी निर्दोष आहे, माझ्यावर अन्याय होतोय'', असं तो म्हणाला. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सुहेबचं कुटुंब आणि त्याची पत्नी अंजूची आईही उपस्थित होती.