स्पेशल रिपोर्ट : वीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी सैन्यात रुजू
महाराष्ट्राची वीरकन्या स्वाती महाडिक आज लेफ्टनंट स्वाती महाडिक झाली आहे. ही तीच वीरकन्या आहे जिचा आयुष्याचा जोडीदार देशाचं रक्षण करतांना अर्ध्या वाटेत सोडून गेला, मात्र आपल्या जोडीदाराचं अर्ध स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीनंही तीच वाट निवडली आणि एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आता या वीरकन्येला, वीरपत्नीला एक नवी ओळख मिळाली आहे आणि ती आहे लेफ्टनंट स्वाती महाडीक...