सदाभाऊंच्या मेळाव्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Continues below advertisement
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, या दौऱ्यात चर्चा झाली ती त्यांनी घेतलेल्या 'शेतकरी समस्या निवारण मेळाव्या'कडे शेतकऱ्यांनी फिरवलेल्या पाठीची.

सदाभाऊंच्या रयत संघटनेच्या वतीने मूर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याने सदाभाऊंची मात्र पार गोची झाली.

याच सभेत सदाभाऊंनी भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची जोरदार पाठराखण केली. ही परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका होत असताना खोतांनी फडणवीसांच्या बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सावरण्यासाठी योग्य पावले उचलल्याचं खोत म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram