मराठा आरक्षणाबाबत महिनाअखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार | मुख्यमंत्री | अकोला | एबीपी माझा
मराठा आरक्षण अहवालावर या महिनाअखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना दिली. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अहवाल फुटलेला नसून त्यासंदर्भात आलेल्या बातम्या म्हणजे पतंगबाजी असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.