लातूर : बदल्यांच्या विरोधात शिक्षक सेनेचं लातुरात आंदोलन

Continues below advertisement
शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं लातूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडण्यात आलं. जवळपास बदली हवी असलेल्या काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरुन स्वताच्या बदल्या हवं त्या ठिकाणी करुन घेतल्या आहेत असा काही शिक्षकांचा आक्षेप आहे.  बदली झालेल्या शिक्षकांची यादी जिल्हास्तरावर प्रसिद्ध करणं आवश्यक असतानाही माहिती दडवून ठेवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळं या बदल्या रद्द् करण्याची मागणी सध्या शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram