लातूर : उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
Continues below advertisement
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या लातूरच्या 26 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदगीरमध्ये राहणाऱ्या सुनील बालाजी बिरादारने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला होता.
सुनीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरीकेहून फोन आला. त्यानंतर घरात एकच आक्रोश सुरु झाला.
Continues below advertisement