लातूर : घरगुती कारणातून एसटीच्या वाहकाची पत्नीसह आत्महत्या
Continues below advertisement
लातूर जिल्ह्यातील घनसरगाव येथे घरगुती कारणातून गिरी दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली. संदीपान प्रभाकर गिरी आणि सरोजा गिरी असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. या दाम्पत्यानं राहत्या घरात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला. संदीपान हे एसटी महामंडळात वाहक पदावर कार्यरत होते. तर सरोजा या संदीपान यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. तर घरगुती वादातून दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत आणि अधिक तपास पोलिस करत आहे.
Continues below advertisement