लातूर : संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव आज शिवसेना आणि शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. आंदोलकांनी निलंगेकरांच्या घरासमोरच त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला. या खुर्चीला 45 हजाराची अंतिम बोली लागली. या लिलावात दीड हजार शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. निलंगेकर यांना शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या लिलावातून मिळालेली रक्कम निलंगातील दोन शेतकऱ्यांना दिली जाणार असून यातील एक हजार रुपये मुख्यमंत्री सहायत्ता निधीला देण्यात येणार आहे.