लातूर : चव्हाण कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा; आरोपींना अटक करा तरत मृतदेह ताब्यात घेऊ

Continues below advertisement
लातूरमधील एका खाजगी क्लासचे संचालक असलेल्या अविनाश चव्हाण यांच्या हत्येला 24 तास उलटल्यानंतरही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. आधी चव्हाण यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ असा आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे. काल रात्री १ वाजता घरी जात असताना शिवाजी शाळेजवळ चव्हाणांवर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश चव्हाण लातूरमधल्या स्टेप बाय स्टेप या क्लासचे संचालक होते. घटनेवेळी चव्हाण हे स्वत:च गाडी चालवत होते. घटनास्थळाजवळच हल्लेखोर दबा धरुन बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram