लातूर : कॉफी शॉप्सवर छापे, अश्लील चाळे करणारे तरुण-तरुणी ताब्यात

Continues below advertisement
कॉफी शॉप्सवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना रंगेहाथ पकडलं. लातुरातील दामिनी पथकाने केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलींसह 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

लातूरच्या कॉलेज परिसरात अनेक कॉफी शॉप्स आहेत. इथे अश्लील चाळे सुरु असल्याचा सुगावा लातूर पोलिसांना लागताच दामिनी पथकाने कॉफी शॉपवर धाड टाकली.

दोन कॉफी शॉप्सवर टाकलेल्या छाप्यात अल्पवयीन तरुणींसह 15 ते 20 तरुण-तरुणींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी कॉफी शॉप चालवणाऱ्या दुकानदारांनाही ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram