लातूर : मोबाईल बॅटरीचा स्फोट, तिघेजण गंभीर जखमी
लातूर जिल्ह्यातल्या अनसरवाडा इथं मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्यानं तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अनसरवाडा गावातल्या बालाजी वाघमारे यांच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानं ते गंभीर जखणी झालेत. त्यात त्यांच्या हाताची दोन्ही बोटं तुटली आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावर आणि इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. मोबाईल चालत नाही म्हणून बॅटरी काढून पुन्हा बसवत असताना हा स्फोट झाला.