लातूर | महापालिका दिवाळखोरीत, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रतिक्रिया
नरेंद्र मोदींनी जीएसटी आणल्यावर निधीवाटपाच्या निकषांमुळे लातूर महापालिकेचा बँड वाजल्याचा आरोप केला जात आहे. एवढी मोठी पालिका दिवाळखोरीत गेल्याने शहराचा विकास थांबला आहे.
लातूर महापालिकेत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांचं तैलचित्र आहे. महापालिका स्थापन झाल्यावर सभागृहात हे चित्र लावण्यात आलं होतं. पण आज या 2.5 बाय 4 फुटाच्या तैलचित्रासाठी रंग द्यायलाही पालिकेकडे पैसे नाहीत.
लातूर महापालिकेचा वार्षिक खर्च 100 कोटी. वार्षिक उत्त्पन्न 25 कोटी रुपये. त्यामुळे जमणार कसं? हा प्रश्नच आहे. खुद्द महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरच दोन महिन्यांपासून आपला पगार झाला नसल्याचं सांगतात.