लातूर : कार जाळून शिक्षिकेची फिल्मी स्टाईल हत्या, पतीला अटक

लातूर : कोणत्याही चित्रपटात शोभेल अशी हत्या लातूरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. चारित्र्याच्या संशयावरुन एका शिक्षिकेचं आयुष्य तिच्याच पतीने संपवलं.

लातूरच्या शिवापूर शाळेतील आदर्श शिक्षिका म्हणून ओळख असणाऱ्या मीनाकुमारी बनसोडे यांची हत्या झाली. विशेष म्हणजे पती 'आय लव्ह यू मीना' असा फोटोही पतीने शेअर केला आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन गेल्या काही दिवसांपासून मीनाकुमारी आणि त्यांचे पती शिवशंकर यांच्यांमध्ये वाद सुरु होते. औरंगाबादला परीक्षेसाठी जाण्याचं कारण देत शिवशंकर मीनाकुमारी यांना गाडीतून घेऊन गेले.

मीनाकुमारी यांना प्रवासाच्या दरम्यान झोपेच्या गोळ्याही देण्यात आल्या. कार मुरुड शहराजवळ येताच शिवशंकर यांनी कार पेट्रोल टाकून पेटवून दिली.

कारने अचानक पेट घेतल्याचा बनाव त्यांनी केला. परंतु शिवशंकर यांचं हे बिंग काही तासातच फुटलं आणि पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola