लातूरमध्ये पहिला ग्रीन कॉरिडॉर, 19 वर्षीय किरणमुळे तिघांना जीवदान

Continues below advertisement
17 किलोमीटरचं अंतर फक्त 9 मिनिटात पार.. ही कोणतीही रेसिंगची स्पर्धा नव्हती, तर तिघांना जीवदान देण्यासाठीची धडपड होती. लातूरमध्ये ब्रेन डेड झालेल्या किरण लोभेचे अवयव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून विमानतळावर नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यावेळी लातूरकरांनीही संयमाची प्रचिती देत या जगण्याच्या संघर्षाला हातभार लावला. पोलिसांचा चोख बंदोबस्त, डॉक्टरांची तत्परता, अँब्युलन्स चालकाचा वेग आणि लातूरकरांचा संयम, यामुळे किरणचं दातृत्व फळाला आलं आणि मुंबई, हैदराबाद आणि औरंगाबादमधल्या तीन रुग्णांचे प्राण वाचले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram