माझा इम्पॅक्ट : लातूरमधील मटका व्यावसायिकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल
Continues below advertisement
लातुरातल्या मटका व्यवसायाविरुद्ध आता स्थानिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं इथल्या ऑनलाईन मटका आणि व्हिडीओ गेम व्यवसायाची बातमी दाखवली होती, त्यानंतर इथली मटका दुकानं बंद होती, मात्र 8 दिवस बंद राहिल्यानंतर आज ही दुकानं पुन्हा सुरु झाली. यानंतर स्थानिक संतप्त झाले आणि त्यांनी सरळ पोलीस ठाणं गाठलं. हा मटका व्यवसाय बंद करावा या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र यापूर्वीही ढिम्म असणारं पोलीस प्रशासन आतातरी कारवाई करत का हे पाहावं लागेल.
Continues below advertisement