लातूर : अविनाश चव्हाणांची हत्या करणारा संभाजी निलंगेकरांचा सुरक्षारक्षक

Continues below advertisement
लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप या क्लासच्या चालकावर गोळ्या झाडणारा हा चक्क मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचं समोर आल्यानं अवघ्या मराठवाड्यात एकच खळबळ माजली आहे.
आज पोलिसांनी या प्रकरणात ज्या 5 जणांना अटक केली आहे... त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे... ही बातमी वाऱ्यासारखी पसरली... आणि व्हॉट्सॅपवर संभाजी निलंगेकर पाटील आणि करण सिंह यांच्या घनिष्ट संबंधांचे पुरावे देणारे फोटो अवघ्या महाराष्ट्रात फिरू लागले... त्यामुळे मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक हा सुपारी किलर आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले...
व्यावसायिक स्पर्धेतून आपल्याच भागिदाराला संपवण्यासाठी खासगी शिकवणी चालक चंदन कुमार याने अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी करण सिंहला 20 लाखांची सुपारी दिली होती... त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी लातूरमध्ये मध्यरात्री 1 वाजता अविनाश चव्हाण यांची हत्या झाली होती..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram