प्रसिद्ध गायिका पुष्पा पागधरेंना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2017 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'इतनी शक्ती हमे देना दाता... मन का विश्वास कमजोर हो ना', ही प्रार्थना आपल्या सुरेल स्वरांनी अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. लतादीदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज राज्य सरकारनं त्यांच्या नावाच्या पुरस्काराची घोषणा केली. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 5 लाख रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.