Lasalgaon | लासलगावमध्ये शेतकऱ्यांकडून कांद्याचे लिलाव बंद | नाशिक | ABP Majha
लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत. शुक्रवारच्या तुलनेत कांद्याच्या दरात सरासरी सहाशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या शेतकऱ्यांना पोलिसांनी पिटाळून लावलंय. सध्या या ठिकाणी कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. पिंपळगाव बाजार समितीमध्येही शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर निफाड चौफुलीवर कांदा उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.