कल्याण | माळशेज घाटात दरड कोसळली, टेम्पोचा चक्काचूर
ठाणे-पुणे मार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला. यामध्ये टेम्पोचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला.
माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला. यामध्ये टेम्पोचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला.