नवी दिल्ली: चारा घोटाळ्यात लालू यादव यांना 14 वर्षांची शिक्षा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा पाय आणखीच खोलात गेलाय.. लालूंना चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा तर 30 लाख रुपयांचा दंड न्यायालयानं ठोठावलाय. आणि जर लालू यादव यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेत एका वर्षाची वाढ करण्यात येणार आहे,... लालू यादव यांना इंडियन पेनल कोडच्या दोन कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.. दोन्ही कलमांतर्गत लालू यादव यांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या वेळी चालतील.. याशिवाय लालू यादवांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आलीय... रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टानं लालू यादव यांना दोषी घोषित केलं..