पाटणा : चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

चारा घोटाळ्यातल्या चौथ्या प्रकरणात लालूत प्रसाद यादव यांना सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं आहे. दुमका इथल्या कोषागारातून १३ कोटी रुपये काढल्याप्रकऱणी ३१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी १९जणांना कोर्टानं याबाबतीत दोषी धरलं आहे. तर १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. जनावरांचा खाद्य,औषधं आणि कृषी साहित्याच्या नावाखाली १९९५ ते १९९६ दरम्यान कोषागारातून तब्बल १३ कोटी रुपये काढण्यात आले होते.
या सर्व आरोपींवर २१, २२ आणि २३ मार्चला शिक्षेची सुनावणी होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola