नाशिक : लहवित गावात रहस्यमय दगडफेक, अख्खं गाव दहशतीत!

Continues below advertisement
सावरखेड एक गाव हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल.  हे गाव ज्याप्रकारे दहशतीत असतं, त्याचप्रकारे नाशिक जिल्ह्यातील एक गाव सध्या दहशतीत आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या लहवित या गावात मागच्या 15 दिवसांपासून अधून-मधून दगडफेक होत आहे. धक्कादायक म्हणजे ही दगडफेक कोण करतं, का करतं...याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.

एखाद्या घरावर किंवा ज्याठिकाणी गावकरी बसलेले आहेत, अशा ठिकाणी एका बाजूनं अचानक दगडं येतात.

दगडं कुठून आली, याचा शोध घ्यायला तिथपर्यंत पोहोचण्याची धडपड केली, तर तेवढ्यात दगडफेक बंदही होते. आतापर्यंत अनेकांच्या घरांचं यात नुकसान झालं आहे तर अनेक जण जखमीही झाले आहेत.

काहींनी तर हा देवाचा कोप असल्याचाही समज करुन घेतला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा प्रकार खोडसाळपणातून होत असल्याचा दावा केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram