शिमला : हिमाचलमधील लाहौलमध्ये तुफान बर्फवृष्टी, पर्यटकांची पावलं हिमाचलकडे
उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळं मध्य आणि दक्षिण भारतातील जनता त्रस्त झाली आहे. मात्र तिकडे हिमाचल प्रदेशातील नागरिक बर्फवृष्टीमुळे गारठले असल्याचं चित्र पाहयला मिळतंय. हिमाचल प्रदेशमधल्या लाहौलमध्ये सध्या बर्फवृष्टी झालीय. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले हिमाचलप्रदेशकडे सरसावत आहेत.