ब्रेकफास्ट न्यूज : कुवेतमध्ये अदनानचा अपमान, स्टाफला 'भारतीय कुत्रे' संबोधलं

Continues below advertisement
कुवेतच्या विमानतळावर गायक अदनान सामीच्या सहकाऱ्यांना भारतीय कुत्रे म्हणून हिणवण्यात आल्याचा संतपजनक प्रकार घडला आहे. अदनान सामीने स्वत: ट्वीट करुन घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. एका कार्यक्रमानिमित्त कुवेतमध्ये गेला असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी माझ्या सहकाऱ्यांना 'इंडियन डॉग्ज' म्हणून हिणवल्याचं आदनान सामीचं म्हणणं आहे. या प्रकाराबाबत स्थानिक दूतावासाशी संपर्क साधूनही काही मदत न मिळाल्याचा आरोप अदनानने ट्विटरवर केला होता. मात्र परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अदनानच्या तक्रारीची तातडीची दखल घेत आपल्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर काही वेळेतच अदनाननं मदत मिळाल्याचं सांगत आभार मानले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram