मुंबई : कुर्ला स्थानकात मोबाईल चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
Continues below advertisement
कुर्ला स्टेशनवर प्रवाशांचे पर्स, मोबाईल सर्सास चोरल्याच्या घटना घडतात. काल सकाळी स्टेशनवर चोर-पोलीसचा थरार प्रवाशांनी अनुभवला.. हार्बर मार्गावरील पनवेल ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल एका चोरट्यानं चोरला. प्रवाशानं आरडाओरडा करताच स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा रक्षकांनी चोराचा पाठलाग केला.. चोर रूळावरून धावू लागला.. त्याच्यामागे 4 आरपीएफचे जवान होते. प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकापर्यंत चोराचा पाठलाग सुरू होता. अखेर त्याला जवानांनी पकडलं. हा सर्व प्रकार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीत कैद झालाय.. आरोपीला वडाळा जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलंय.
Continues below advertisement