मुंबई : राज्यसभा निवडणुकीत राज्यातून कुमार केतकर काँग्रेसचे उमेदवार
भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.