श्रीनगर : अपहरण करुन जवानाची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस कर्मचारी सलीम शाहची हत्या करणारे दहशतवादी यामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी सलीम यांची हत्या करण्यात आली होती. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने जारी केलेल्या एका व्हिडीओमुळे भारतीय सैन्याने ही चकमक सुरू केली. या व्हिडीओत दहशतवादी शहीद समील शाह यांची चौकशी करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील आवाजाचा आधार घेत पोलिसांनी कुलगाममध्ये एका परिसराला घेरावा घातला आणि ऑपरेशन सुरू केलं. सलीम शाहचा हत्येपूर्वी शारीरिक छळ केल्याचंही समोर आलं आहे.