कोझीकोडे, केरळ : शहराला नैऋत्य मोसमी पावसाचा तडाखा, पुराचं थैमान

Continues below advertisement
नैऋत्य मान्सून पावसाचा चांगलाच फटका केरळातील कोझीकोडे शहराला बसलाय. सध्या या शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत 21 जणांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आलं असून अजूनही 591 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान 15 जून पर्यंत केरळ आणि लक्ष्यद्विपला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. सध्या भूस्खल आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या परिसरात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैन्यात करण्यात आल्या आहेत. हवेचा प्रचंड झोत आणि उंच लाटांमुळे सागरी किनारपट्टीवर राहणाऱ्यांना आणि मच्छिमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram