पुणे : थोडं-थोडं करुन बारा दिवस नोकरानेच दुकानात मारला डल्ला
Continues below advertisement
पुण्यात एका किराणा दुकानात थोडं-थोडं करुन तब्बल 12 दिवस चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. कोथरुडमधल्या शास्त्रीनगरमध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उजेडात आला. दुकानात काम करणारा नोकर आणि त्याच्या एका साथीदारानं ही चोरी केल्याचं लक्षात येताच त्यांना अटक केली गेली. थोडं-थोडं करुन आरोपींनी तेलाचे डबे, ड्रायफूट्स, साबण, धान्य असा बराचसा माल लंपास केला.
Continues below advertisement