पुणे : कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा गावात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. सगळं गाव एकत्र नांदतं. आम्ही आधीही एकत्र होतो, यापुढेही एकत्र राहू. गावात घडलेला प्रकार बाहेरच्या व्यक्तींकडून झाला आहे, असा आरोप कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केला आहे.
कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनीही सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून गावातील दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला.