कोरेगाव भीमा शौर्यदिनाला आज 201 वर्ष पूर्ण | पुणे | एबीपी माझा
कोरेगाव भीमा शौर्यदिनाला आज 201 वर्षे पूर्ण होतायत..त्यानिमित्तानं विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी कोरेगाव भीमात दाखल झाले आहेत...वेगवेगळ्या संघटनांच्या 5 सभांचं आयोजन करण्यात आलंय..अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय..जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.