कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज, सीसीटीव्ही-ड्रोनची नजर | एबीपी माझा
कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झालं आहे. कोरेगाव-भीमामध्ये तब्बल 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्यांच्यावर पूर्वी शांतता भंग करणे, जातीय तणाव वाढवणे अशे गुन्हे आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं.