ब्रेकफास्ट न्यूज : कोरियन अध्यक्षांची भेट, किम जोंग उन म्हणाला, नवा अध्याय लिहू!

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष  मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं.

कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले. ही भेट दोन्ही देशाच्या सीमेवरील डिमिलिट्रायज जोन अर्थात डीएमझेडवर झाली.

डीएमझेडमध्ये बनलेल्या पनमूनजेओम गावाजवळ ‘पीस हाऊस’ इथं दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांना भेटले.

1953 मध्ये कोरिया युद्धानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या नेत्याने दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाय ठेवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola