सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस, वीज पुरवठा खंडित, महामार्गही मंदावला
Continues below advertisement
एकीकडे महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वेगाने होत असताना तळ कोकणात मान्सूनपूर्व पावसाने आज धुमाकूळ घातला... सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना आज तुफानी पावसानं झोडपून काढलं...
सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला... अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्यानं वीज पुरवठाही खंडित झाला... त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूकही मंदावली होती...
तर तिकडे रत्नागिरी शहरामध्येही मेघगर्जनेसह पाऊस सुरु झाला... कार्यालये सुटण्याच्या वेळीच पाऊस आल्यानं अनेकांची त्रेधा उडाली...
संगमेश्वर आणि लांजाच्या काही भागातही जोरदार पाऊस झाला...