मुंबई: कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेची उडी

पालघर पोटनिवडणुकीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होत आहे. पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी शिवसेना भाजपच्या निरंजन डावखरेंविरोधात उमेदवार देणार आहे.

कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपकडून निरंजन डावखरे निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादीही आव्हाड समर्थक नजिब मुल्ला यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola