कोलकाता : अजगरासोबत सेल्फी महागात, थोडक्यात निभावलं
Continues below advertisement
कोलकात्यात अजगरासोबत सेल्फी काढण्याचं वेड वनरक्षकाला चांगलंच भोवलं आहे. पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकानं अजगरासोबत सेल्फी घेण्याचं धाडस केलं. पण वनरक्षकाचा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला. अखेर इतर काही लोकांच्या मदतीनं अजगराच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्याची वेळ वनरक्षकावर आली. जलपाईगुडीमध्ये घडलेल्या या प्रकाराच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Continues below advertisement