कोलकाता : खेळण्यातील बंदूक समजून लहान मुलीनं झाडली आईवर गोळी
Continues below advertisement
खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून एका लहान मुलीनं चक्क आपल्या आईवर चुकून गोळी झाडल्याची घटना कोलकात्याच्या हुगळी भागात घडली आहे. घराबाहेर मुलीच्या आईलाच ही बंदूक सापडली होती. मात्र ही बंदूक खेळण्यातली असावी असं समजून आईनं ती बंदूक आपल्या मुलीला खेळायला दिली. आणि खेळता-खेळता मुलीनं बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि त्यातून सुटलेली गोळी तिच्या आईच्या पाठिला लागली. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement