
Mamata Banerjee | पंतप्रधान मोदींच्या देवदर्शनाच्या प्रक्षेपणावर ममता बॅनर्जींचा आक्षेप | ABP Majha
Continues below advertisement
तृणमूल काँग्रेसनं पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ आणि बद्रीनाथमधल्या कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय. मोदींच्या दौऱ्याचं प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर सातत्यानं होत आहे. त्याच्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. त्याच वेळी मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथला देवदर्शनासाठी गेले आहेत. हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार ममतांनी केलीय.
Continues below advertisement