कोलकाता : शमीवर गंभीर आरोप, पत्नी हसीन जहाशी बातचीत

Continues below advertisement
मुंबई : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीनजहांने केला आहे. इतकंच नाही, तर शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत.

हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. मोहम्मद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे.

शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीनजहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं.

27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram